शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:19 IST

महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ, मविआकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते.

Karjat Jamkhed ( Marathi News ) : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातच पुन्हा प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात नाराजांचे मन वळविण्यात यश मिळविले. विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी मागे घेतले. आता एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. 

सोमवारी (दि. ४) विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. यात महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ, मविआकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. दोन्ही भूमिपुत्रांनी माघार घेत आपली भूमिका पक्षासोबत ठेवली आहे. यासह मनसेचे रवींद्र कोठारी, रासपाचे स्वप्निल देसाई, इतर ८ अशा एकूण १२ जणांनी विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतले. कर्जत-जामखेडसाठी ११ उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. यात मुख्य लढत पुन्हा एकदा भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात रंगणार आहे. आमदार रोहित पवार आपला बालेकिल्ला कायम राखतात की आमदार राम शिंदे त्यांना धोबीपछाड देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह

यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात नावाचे साधर्म्य असणारे भाजपचे प्रा. राम शिंदे यांच्यासह तीन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित राजेंद्र पवार यांचे तुतारी चिन्ह असून अपक्ष असणारे रोहित चंद्रकांत पवार यांना ट्रम्पेट चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत याच ट्रम्पेट चिन्हांनी ४४ हजारांच्या पुढे मतदान मिळविले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karjat-jamkhed-acकर्जत-जामखेडRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAhilyanagarअहिल्यानगरRam Shindeराम शिंदे