श्रीरामपूर : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धेत येथील शिवम लोडे याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची राज्याच्या संघात निवड झाली असून, टाटानगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो खेळणार आहे. राज्याच्या संघ निवडीसाठी ही राज्यस्तरीय धनुर्विद्या निवड चाचणी पार पडली. टाटानगर येथे २ ते १० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत शिवम याला चमक दाखविण्याची आता संधी आहे. नगर येथील अथर्व सुतार याचीही राज्याच्या संघात यावेळी निवड करण्यात आली.
दोन्ही खेळाडूंना नगर जिल्हा धनुर्धारी संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक अभिजित दळवी, प्रशिक्षिका शुभांगी रोकडे, सचिन घावटे, किशोर बेरड, धनंजय करांडे यांचे प्रशिक्षण लाभले. खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश शेटे, कोषाध्यक्ष सुनील चावरे, सरोज दळवी, पल्लवी चव्हाण, रूपेश चव्हाण, मिरा बेरड, सुनील बेरड यांनी कौतुक केले आहे.