शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे शेतक-याच्या आशेवर फिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:17 IST

अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.

राजूर : मेहनत, मशागत आणि जिद्दीला योग्य व्यवस्थापनाची जोड देत युवा शेतक-याने काकडीची बाग फुलवली. त्याने केलेल्या कष्टाला फळही मिळाले.दिवसाआड तीन टनापर्यंत उत्पादनही सुरू झाले. अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटात दळणवळण व्यवस्था कोलमडली आणि या युवा शेतक-याच्या आशेवर पाणी फिरले.
पारंपरिक शेतीला फाटा देत विठ्ठल चौधरी या तरुण शेतकऱ्याने कर्जाऊ रक्कम घेत कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक एकर क्षेत्रात शेडनेट हाऊसची उभारणी केली. त्यात ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. पावसाळी हंगामात झेंडू घेत त्यांनी दमदार सुरुवात केली. तर उन्हाळी पिकाचे नियोजन करत शिमला मिरची आणि काकडीचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली. यावर्षी काकडीचा बाग उभी करण्याचे ठरवले. नियोजनाप्रमाणे ४८ हजार रुपयांचे काकडीचे बी त्यांनी खरेदी केले. शेणखताचा वापर करत शेतीची मशागत केली. बेड तयार करत नवीन मल्चिंग पेपरचा वापर करत बियांचे रोपण केले. चोख व्यवस्थापनामुळे ३५ दिवसांत काकडीच्या बहरलेल्या वेलींना मोठ्या प्रमाणात काकड्या लगडल्या. या वर्षी कर्ज फिटणार असा आशावाद निर्माण झाला. पहिला तोडा सुरू होणार तोच लॉकडाऊन सुरु झाले. वाहतूक व्यवस्था नसल्याने आणि बाजारपेठा बंद असल्याने मोठी समस्या त्यांना निर्माण झाली. बाजारपेठ सुरू झाली असली तरी फक्त साडेतीन टन माल व्यापारी घेत आहेत. उरलेला माल जनावरांना चारा म्हणून विठ्ठल चौधरी वापरु लागले.

चौदा लाख रुपये खर्च करून तीन वर्षापुर्वी एक एकर क्षेत्रात शेडनेट उभे केले. दहा लाख रुपये कर्जाऊ घेतले. आत्मविश्वासाने पारंपरिक शेतीला बाजूला करत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेती सुरू केली. पहिल्या वर्षी तीन लाख रुपयांचे खर्चासह उत्पन्न मिळाले. दुसरे वर्षी बाजार भाव कोसळले. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. उन्हाळ्यात काकडीचे नियोजन केले. नियोजनाप्रमाणे उत्पन्नही मिळू लागले. कोरोनामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडली. काकड्या जनावरांसाठी  वापरत आहे. – विठ्ठल चौधरी, शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले