शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

साईमंदिर उघडण्यासाठी प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

शिर्डी : साईमंदिर खुले करण्यासाठी शासनाला विनंती करू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित व आनंददायी दर्शनासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही ...

शिर्डी : साईमंदिर खुले करण्यासाठी शासनाला विनंती करू, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षित व आनंददायी दर्शनासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही साईसंस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

साईबाबा संस्थानच्या २० व्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी दुपारी मध्यान्ह आरतीनंतर अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, जयंतराव जाधव, अनुराधा आदिक, ॲड. सुहास आहेर, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, सचिन गुजर व नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर या नवनिर्वाचित विश्वस्तांची उपस्थिती होती. सीईओ भाग्यश्री बाणायत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व विश्वस्तांचे संस्थानच्या वतीने स्वागत केले.

पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काळे म्हणाले, मंदिर उघडण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे परिसराच्या अर्थकारणाला आधार मिळेल. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच पंचक्रोशीच्या विकासासाठी संस्थानच्या नियमांत राहून सर्वांशी समन्वय ठेवून काम करू, असे सांगितले.

शिर्डी नगरपंचायतच्यावतीनेही नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सुजीत गोंदकर, अशोक गोंदकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व विश्वस्तांचा सत्कार करत, नगरपंचायत व संस्थानचा समन्वय कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

आमदार काळे पदभार स्वीकारण्यासाठी मंदिर परिसराजवळ येताच राष्ट्रवादी व ग्रामस्थांच्यावतीने गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे रमेशराव गोंदकर, नीलेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, प्रकाश गोंदकर, अक्षय काळे आदींनी स्वागत केले.

..................

साईसंस्थानच्या व्यवस्थापनात सर्वपक्षिय सदस्य

राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे नेते ॲड. जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या अन्य नऊ सदस्यांची नियुक्ती केली आहे. व्यवस्थापनात नगराध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतात. सध्या भाजपचे शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष असल्याने त्यांच्या रूपाने व्यवस्थापनात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसबरोबरच भाजपचाही समावेश आहे.

.........

दोन अनुभवी विश्वस्तांचा समावेश

या व्यवस्थापनात डॉ. एकनाथ गोंदकर व सुरेश वाबळे यांच्यारूपाने अनुभवी विश्वस्तांचा समावेश आहे. डॉ. गोंदकर यांना मागील दोन टर्ममध्ये जवळपास तेरा तर वाबळे यांना मागील टर्ममध्ये आठ वर्षांचा व्यवस्थापनाचा अनुभव गाठीशी आहे.