एकजुटीतून काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:58+5:302021-09-21T04:22:58+5:30

चिचोंडी पाटील : स्व. दादापाटील शेळके व स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांच्या सुवर्ण काळाप्रमाणे काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस यावेत यासाठी ...

Let us bring a golden day to the Congress through unity | एकजुटीतून काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणू

एकजुटीतून काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस आणू

चिचोंडी पाटील : स्व. दादापाटील शेळके व स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांच्या सुवर्ण काळाप्रमाणे काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस यावेत यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटितपणे काम करणे गरजेचे आहे. त्यातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर निवडणुकांमध्ये यश मिळविणे शक्य होईल, असे मत काँग्रेसचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी व्यक्त केले.

टाकळी काझी (ता. नगर) येथे काँग्रेस कार्यकर्ता शिबिर सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा सरचिटणीस आबासाहेब कोकाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत वाघ, दत्ता नारळे, युवकचे तालुकाध्यक्ष अक्षय कुलट, अंकुश शेळके, गुलाबराव काळे, डॉ. ययाती फिसके आदी उपस्थित होते.

अंकुश शेळके म्हणाले, केवळ वर्षातून एखादी बैठक घेऊन पक्षवाढीचे काम होणे कठीण आहे. त्यामुळे पक्षासाठी संपर्क कार्यालयाची आवश्यकता आहे. यात पक्ष पदाधिकारी व वरिष्ठ नेते मंडळींनी लक्ष घालून प्रयत्न करावेत.

बाळासाहेब साळुंके म्हणाले, सातत्याने खोटे बोलण्याने समाजाला ते खरे वाटू लागते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. अशाप्रकारे भाजपने काँग्रेसविषयी खोटी विधाने करत लोकांना भ्रमित करून निवडणुका जिंकल्या. त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात काँग्रेस कार्यकर्ते कमी पडल्याने फटका बसला.

200921\screenshot_20210920-090842_gallery.jpg

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील टाकळी काजी येथे नगर तालुका काँग्रेस आय कमिटी तर्फे आयोजित कार्यकर्ता शिबिरात मार्गदर्शन करताना अहमदनगर जिल्हा काँग्रेस आय कमेटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके समवेत काँग्रेस आईचे पदाधिकारी व कार्यकर्ते (छायाचित्र : संजय ठोंबरे)

Web Title: Let us bring a golden day to the Congress through unity