नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:20+5:302021-06-29T04:15:20+5:30

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, महामार्गावर बोटा ते संगमनेर या ठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत. ...

Kingdom of potholes on Nashik-Pune National Highway | नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, महामार्गावर बोटा ते संगमनेर या ठिकाणी अनेक खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यात साचते असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रविवारी सायंकाळी अनेक वाहनांचे टायर फुटले. काही दुचाकीस्वारांचे अपघात झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. या मार्गाची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी एका ठेकेदार कंपनीने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समोर आले. दरवर्षी पहिल्याच पावसात महामार्गावर मोठे खड्डे पडत आहेत. काही महिन्यांपूर्वी या महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडले होते, ते खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले होते. मात्र आता पावसाळा सुरू झाला असून, टाकलेला मुरूम निघून गेल्याने पुन्हा बोटा, घारगाव, डोळासणे, माहुली आदी परिसरात महामार्गावर पुन्हा खड्डे पडले आहेत. रविवारी झालेल्या पावसाने खड्ड्यांमध्ये पाणी साचले. वाहनचालकांना अंदाज न आल्याने अनेक वाहने खड्ड्यांमध्ये आदळून त्यांचे टायर फुटले असून, दुचाकींचेही अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हे खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

...............

नाशिक-पुणे महामार्गावर मुळा नदी पुलालगत पडलेल्या खड्ड्यात तीन ते चार दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार पडले. सुदैवाने ते वाचले. एकजण बेशुद्ध झाला होता. महामार्ग प्रशासनाने पाऊस पडण्याच्या आधी खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र, त्यांना अजूनही जाग आली नाही.

- खालिद शेख, व्यावसायिक, घारगाव

...........

संगमनेर ते आळेखिंड दरम्यान महामार्गावर अनेक खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजविले जातात. पावसाळ्यात हे खड्डे उघडे पडतात. यात वाहने आदळून मोठे नुकसान होते आहे. टोलवसुली जोरात सुरू आहे. मात्र, दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात आहे.

-गणेश लेंडे, सामाजिक कार्यकर्ते

280621\img_20210628_12011520.jpg

???? ??? : ?????-???? ??????????? ???????? ???????????? ???????? ???? ?????

Web Title: Kingdom of potholes on Nashik-Pune National Highway