नागेश विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST2021-09-25T04:20:29+5:302021-09-25T04:20:29+5:30
जामखेड : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

नागेश विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात
जामखेड : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, माजी सहसचिव एम. के. भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कन्या विद्यालय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्राचार्य बी. के. मडके, मुख्याध्यापिका के. डी. चौधरी, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मंगेश आजबे, उपप्राचार्य प्रकाश तांबे, पर्यवेक्षक डी. एन. साळवे, पी. डी. सोनवणे, प्रा. विनोद सासवडकर, प्रा. वायकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, कुंडल राळेभात, महेश राऊत, मुक्तार सय्यद आदी उपस्थित होते.