श्रीगोंदा शहरात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:29+5:302021-09-24T04:25:29+5:30

श्रीगोंदा : येथील रयत संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बँड पथकाच्या सुमधूर संगीतासोबतच संतोष ...

Karmaveer Jayanti celebrated in Shrigonda city | श्रीगोंदा शहरात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

श्रीगोंदा शहरात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

श्रीगोंदा : येथील रयत संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बँड पथकाच्या सुमधूर संगीतासोबतच संतोष व सुनील शिंदे, संजय राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देखाव्यांमध्ये मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल बाॅडीचे सदस्य बाबासाहेब भोस होते. महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.

परिक्रमा संकुलाच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा पाचपुते, बाबासाहेब भोस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अमेठी (उत्तर प्रदेश) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळविणाऱ्या भाग्यश्री फंड हीचा सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पन्नास हजार रुपये कायम ठेव म्हणून ठेवणारे ॲड. संभाजी बोरुडे व ॲड. समित बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, उपनगराध्यक्ष मनीषा लांडे, मुख्याध्यापिका वंदना नगरे, एम. एस. लगड, बाजीराव कोरडे, महावीर पटवा, बापूराव औटी, संदीप नागवडे, हरिश्चंद्र नलगे, जयश्री औटी आदी उपस्थित होते.

प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी प्रास्ताविक, वसंत दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य शहाजी मखरे यांनी आभार मानले.

Web Title: Karmaveer Jayanti celebrated in Shrigonda city