शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कारगिल विजया’मुळे एनसीसी छात्रांना देशसेवेची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST

चंद्रकांत शेळके अहमदनगर : स्वातंत्र्यानंतर भारताला अनेकवेळा स्वसंरक्षणासाठी युद्धात भाग घेऊन पाकिस्तानशी लढावे लागले. त्यामधील १९९८ मध्ये पाकिस्तानने ...

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : स्वातंत्र्यानंतर भारताला अनेकवेळा स्वसंरक्षणासाठी युद्धात भाग घेऊन पाकिस्तानशी लढावे लागले. त्यामधील १९९८ मध्ये पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीचा नायनाट करण्यासाठी भारताला पाकिस्तानशी दोन हात करावे लागले. भारताचे हे स्वातंत्र्यानंतरचे मोठे युद्ध होते. पाकिस्तान विरुद्धच्या या कारगिल संग्रामात भारतीय स्थलसेनेने अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली. १९९८ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष अखेर २६ जुलै १९९९ रोजी थांबला आणि भारताने पाकिस्तानवर अभूतपूर्व असा विजय मिळवला. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाबद्दल दरवर्षी २६ जुलैला भारतामध्ये कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या विजयाचा भारतीयांना अभिमान आहे तसाच हा विजय सैन्यात येऊ पाहणाऱ्या एनसीसीच्या छात्र सैनिकांसाठी मोठा प्रेरणादायी आहे. या विजय दिवसानिमित्त एनसीसी छात्र आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

--------------

इंडियन आर्मीने कारगिलच्या युद्धामध्ये जिवाची पर्वा न करता भारताकरिता दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची किंमत होऊ शकत नाही.

- कर्नल जीवन झेंडे

-------------

भारतीय सैन्य दलाला गौरवमय परंपरा आहे. ती जोपासण्याचे काम सैन्य दले स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जोपासत आहे.

- कर्नल विनय बाली

-------------

भारतीय शूरवीरांनी देशासाठी केलेले सर्वोच्च बलिदान हे आमच्याकरिता प्रेरणादायी असून, त्यांच्या वीरमरणामुळे व सर्वोच्च कामगिरीमुळे देश आज सुरक्षित आहे.

- मेजर डॉ. संजय चौधरी

---------

पाकिस्तानने केलेल्या कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले आहे. याचा मला अभिमान आहे .

- कॅडेट प्रेमराज गायकवाड

-----------

एनसीसीच्या माध्यमातून मला सैन्य दलात जाऊन भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीप्रमाणे कार्य करण्याची इच्छा आहे.

- कॅडेट कृष्णा वारे

---------

भारतीय सैनिक व अधिकारी यांनी केलेल्या कारगिलमधील कार्यापासून मला प्रेरणा मिळाली आहे.

- कॅडेट पंकज अनारसे

----------------

भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धामध्ये केलेले कार्य महत्त्वाचे असून, त्यात त्यांच्या परिवारास जास्तीत जास्त आर्थिक फायदा दिला पाहिजे.

- कॅडेट संदीप नवसरे

------------

कारगिल विजय दिवस हा आमच्यासाठी व नागरिकांसाठी तसेच एनसीसी कॅडेटसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही एनसीसी विभागांमध्ये स्वतंत्र दालन सुरू केले आहे.

- प्राचार्य डॉ. बाळ कांबळे

---

फोटो मेल वर पाठवला