कल्पना वाघुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:48+5:302021-09-07T04:26:48+5:30
श्रीरामपूर : येथील प्रा. विजय कुऱ्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्पना वाघुंडे यांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार हा अनेक महिलांना प्रेरणादायी ...

कल्पना वाघुंडे
श्रीरामपूर : येथील प्रा. विजय कुऱ्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कल्पना वाघुंडे यांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार हा अनेक महिलांना प्रेरणादायी असल्याचे मत माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी व्यक्त केले.
गुरुमाउली सेवाभावी संस्थेच्या माउली वृद्धाश्रमामध्ये शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी कल्पना सुभाष वाघुंडे यांना पुरस्कार देण्यात आला. वृद्धाश्रमासाठी प्रा. कुऱ्हे परिवाराने विठ्ठल, रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. वाचन संस्कृतीकडून वृद्धांना पुस्तके भेट देण्यात आली. नंदकिशोर कुऱ्हे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन संगीता फासाटे यांनी केले. प्रा. बाबूराव उपाध्ये, अनुसरा सोनसडे, माजी मुख्याध्यापक बबनराव तागड, संजय पगारे, लेविन भोसले, प्रा. शिवाजी बारगळ, लक्ष्मीबाई पालवे, सतोबा राऊत, दिनकर पोखरकर, सुरेश गड्डे, सुनील शेरकर, राजेंद्र रासने उपस्थित होते.
-----------