शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये मुख्याधिकारी वसुलीसाठी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST

जामखेड : नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व रहिवासी यांच्याकडे मालमत्ता करापोटी साडेआठ कोटी थकीत आहेत. अनेक गाळेधारकांनी आठ ते दहा ...

जामखेड : नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व रहिवासी यांच्याकडे मालमत्ता करापोटी साडेआठ कोटी थकीत आहेत. अनेक गाळेधारकांनी आठ ते दहा वर्षे भाडेही भरले नाही. त्यांच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते हे वसुली पथकासह मैदानात उतरले. ते थेट दुकाने सील करीत असल्याने गाळेधारकांनी पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. आठ ते दहा गाळे सील केले आहेत. दोन दिवसांपासून करवसुलीच्या धडक मोहिमेत पाच लाख अकरा हजार रुपयांचा वसूल झाला आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीतील व्यावसायिक गाळेधारकांकडे आठ ते नऊ वर्षांपासूनचे भाडे थकीत होते. एका एका गाळेधारकाकडे साठ ते सत्तर हजार रुपये थकीत होते. कधीही कर भरलेला नव्हता. या सर्व गाळेधारकांना नोटिसा पाठविल्या. जे भरणार नाहीत, असे गाळे सील करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाळेधारकांनी थकीत भाडे भरण्यासाठी सुरुवात केली.

याबाबत मिनिनाथ दंडवते म्हणाले, नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व घरगुती अशी मोठी थकबाकी आहे. त्यामुळे सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. सर्व नागरिकांनी आपापली थकबाकी भरावी. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवासुविधा उपलब्ध करून देणे सुलभ होईल. कररूपाने गोळा होणारा पैसा सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जातो. सर्व हिशोब नगरपरिषद कार्यालयात असेल. तेव्हा थकबाकीधारकांनी ताबडतोब आपापली थकबाकी भरावी.

वसुली पथकात विष्णू भिसे, रामराव नवगिरे, राजेंद्र गायकवाड, अविनाश साबळे, सिद्धेश मुळे, अतुल कोकाटे, अभिजित भैसाडे, प्रमोद टेकाळे, लक्ष्मण माने, निवृत्ती चव्हाण, विजय पवार, संजय खेत्रे, उमेश राऊत, हितेश वीर, रज्जाक शेख, राम नेटके,संतोष अडाले, सय्यद वली, ऐयाज शेख कर्मचारी आहेत.