आदिवासी समाजाच्या अडचणी साडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:59+5:302021-09-08T04:25:59+5:30
मंत्री ढवळे यांनी नगर तालुक्यातील इसळक येथे सोमवारी आदिवासी वस्तीला भेद देऊन आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या. घरकुल योजनेत ...

आदिवासी समाजाच्या अडचणी साडविणार
मंत्री ढवळे यांनी नगर तालुक्यातील इसळक येथे सोमवारी आदिवासी वस्तीला भेद देऊन आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या. घरकुल योजनेत जागा, कागदपत्रे, रेशन कार्ड आदींबाबत येणाऱ्या अडचणी, अनेकांना रेशन कार्ड नसल्याने धान्य मिळत नाही, आदी अडचणी रहिवाशांनी मंत्र्यांसामोर मांडल्या. यावेळी मंत्री ढवळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी आदिवासी योजनांची माहिती देत लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच संजय गेरंगे, शिवाजी खामकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अमोल शिंदे, सीताराम सकट, समीर पटेल, गणेश चव्हाण, अरविंद बेरड, स्वरा गेरंगेसह आदिवासी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ०७ शिवाजी ढवळे
राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी इसळक येथे आदिवासी वस्तीला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या.