नगरमध्ये काँग्रेसला देणार नवी ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:23+5:302021-09-24T04:25:23+5:30
अहमदनगर : अहमदनगर शहरात काँग्रेसला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत, अशी माहिती ...

नगरमध्ये काँग्रेसला देणार नवी ऊर्जा
अहमदनगर : अहमदनगर शहरात काँग्रेसला नवी ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत, अशी माहिती प्रदेश सचिव दीप चव्हाण यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींना दिली.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक गुरुवारी मुंबई येथील टिळक भवनात झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, पक्षाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदाची जबाबदारी दिली. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षपणे पार पाडणार असून, कार्यकर्ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. वाढती महागाई व प्रचंड बेरोजगारी वाढल्याने केंद्र सरकारच्या निषेधाचा ठराव बैठकीत करण्यात आला.
..
२३ चव्हाण
फोटो ओळी: मुंबई येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत बोलताना प्रदेश सचिव दीप चव्हाण.