शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

भावी वारसदारांसाठी एवढे करायलाच हवे!

By admin | Updated: May 27, 2016 23:17 IST

अहमदनगर हे स्थापना दिन साजरा करणारे राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं! ५२५ वयाचे हे शहर आजही शहरवासीयांकडे आपली ओळख शोधत आहे

अहमदनगर हे स्थापना दिन साजरा करणारे राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं! ५२५ वयाचे हे शहर आजही शहरवासीयांकडे आपली ओळख शोधत आहे. याला आम्ही नगरकरच कारणीभूत आहोत का? यावर मंथन होणे गरजेचे आहे़ माझ्या वाढदिवसाइतकाच किंबहुना त्यापेक्षाही माझ्या शहराचा वाढदिवस महत्वाचा व्हायला हवा असे एक कलावंत म्हणून मला नेहमी वाटते.
नगर शहराची वेगळी ओळख सांगता येईल असा भुईकोट किल्ला, फराह बक्श महल , हस्त-बेहस्त बाग , चाँदबिबी महाल, हत्ती बारव, अशा ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहेत़ या वास्तू एकमेवाद्वितीय आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही दुसरी चाँदबिबी झालेली नाही व कुठेही चाँदबिबीचा महाल नाही. सपाट पठारावर अभेद्य भुईकोट किल्ला बांधणारा अहमदशहा जगात दुसरा नाही, पण असे असूनही आजही आमच्या या पूर्वजांचा आम्हाला सार्थ अभिमान नाही. हा वारसा जपण्याची, वेगवेगळ्या मार्गाने हा वारसा जगभरात पाठवण्याची तळमळ नाही. या वास्तुंचे जतन, संवर्धन, व प्रसिध्दीसाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रयत्न होताहेत पण या प्रयत्नांना शासकीय पातळीवरून अपेक्षित प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे़ शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तुंची डागडुजी होणे गरजेचे आहे तर काही ठिकाणी परिसर सजावटीची गरज आहे. सर्वच वास्तुंची प्रसिध्दीही होणे गरजेचे आहे. या वास्तुंपर्यंत जाण्यासाठी कायमस्वरूपी अथवा ठराविक वारी वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. या विविध वास्तुंची माहिती, महत्व सांगणाऱ्या पुस्तिका, मार्गदर्शिका करून द्यायला हव्यात. शासकीय पातळीवर ही बाजू सावरली तरी आपल्या शहराचा अभिमान बाळगणाऱ्या नगरकरांची आपली भूमिका महत्वाचीच आहे.
मराठवाड्यात जाणारे, शिर्डी, शिंगणापूर, राळेगणसिध्दी, हिवरे बाजारकडे मुक्कामी असलेले पर्यटक येथे नक्कीच थांबतील़ आपल्या वारशाबाबत उदासीनता सोडली तरी बरेचसे काम होणार आहे. शहराच्या इतिहासाविषयी, इथल्या परंपरांविषयी आम्ही आत्मीयता बाळगली तर ती इतरांच्या मनात रूजवता येईल. ‘अतिथी देवो भव।’ असे आमची संस्कृती सांगते. अतिथीला थेट देवाचे स्थान दिले आहे त्यामागची भूमिका समजावून आमचे वर्तन हवे. इथे आपुलकी हवी, प्रेम हवे, माणुसकी, सचोटी, आदरातिथ्य हवे. अतिथी पुन्हा पुन्हा यावा वाटत असेल तर या शहराची प्रतिमा डागाळणार नाही़ यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न आवश्यक आहे.
एकाने चांगले वागून त्याचा परिणाम होत नाही, कारण चांगल्या गोष्टींपेक्षा वाईटाचा लवकर व सर्वदूर प्रसार होतो. याचे भान यजमानाला असायलाच हवे. या साऱ्यांचा परिपाक म्हणजे शहर विकासाचा वसा शासनाबरोबरच प्रत्येकाने व्यक्तिश: घ्यायला हवा तरच जगाच्या नकाशावर अहमदनगरचे नाव चांगल्या अर्थाने झळकेल, नावारूपाला येईल व पूर्वजांचा वारसा नव्या पिढीने जपला असे होईल.
पुढच्या पिढीसाठी, शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नगरकरांनो एवढा संकल्प आजच्या ५२६ व्या स्थापना दिनी करायलाच हवा.
-प्रमोद कांबळे
शिल्पकार