शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST

अहमदनगर : शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार डॉ.सुजय ...

अहमदनगर : शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. महापालिका प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार डॉ.सुजय विखे यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई केल्याने भाजपमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका आता विनापरवाना फलकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न या निमत्ताने उपस्थित झाला आहे.

शहरासह उपनगरांत राजकीय पक्षांचे मोठेमोठे फलक लावण्यात आले आहेत. शहरातून जाणारे महामार्ग जाहिरात फलकांनी झाकोळून गेले आहेत. शहरातील प्रमुख चौकात राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवडीबद्दल अभिनंदन, नेत्यांचे स्वागत, यांसह अनेक अनधिकृत फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेने लॉकडाऊननंतर प्रथमच अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच, मंगळवारी पालिकेने भाजपचे चार ठिकाणचे फलक हटविले. ही कारवाई भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपने रितसर परवानगीसाठी पालिकेत अर्जही केला आहे. महापालिकेतून पायउतार झाल्यानंतर भाजपाला प्रथमच कारवाईला सामोरे जावे लागले. ही कारवाई प्रशासनाने स्वत:हून केली की, कुणाच्या सांगण्यावरून, याबाबत साशंकता आहे.

महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अनेक फलक शहरात लावलेले आहेत. हे फलक लावताना महापालिकेची परवानगी घेतली गेली नाही. या फलकांवर पालिकेने कारवाई केली नाही. यापूर्वीही पालिकेकडून फलकांवर कुठलीही कारवाई झाली नाही, परंतु अचानक भाजपाच्या फलकांवर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेने ही कारवाई सुरू ठेवली नाही. पालिकेने फलकांवरील कारवाईची मोहीम गुंडाळली, हे विशेष

.....

पालिकेला भाजपचेच फलक दिसले का?

महापालिकेने भाजपने लावलेल्या फलकांवर कारवाई केली. परवानगीसाठी अर्ज देण्यात आलेला आहे. जाहिरात फलकांसाठी पालिकेची रितसर परवानगी घेतली जाईल, परंतु शहरात ते विनापरवाना फलक आहेत. त्यांच्यावर पालिका कारवाई करणार का, शहरात किती अनाधिकृत फलक आहेत, याची माहिती घेणार असून, कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी याबाबत बोलताना सांगितले.

....