बोठे याच्या ‘हनीट्रॅप’ची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:45+5:302020-12-24T04:19:45+5:30

याबाबत लगड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरे यांच्या हत्याकांडाला २१ दिवस उलटून गेले आहेत तरी फरार बोठे ...

Investigate Bothe's Honeytrap | बोठे याच्या ‘हनीट्रॅप’ची चौकशी करा

बोठे याच्या ‘हनीट्रॅप’ची चौकशी करा

याबाबत लगड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जरे यांच्या हत्याकांडाला २१ दिवस उलटून गेले आहेत तरी फरार बोठे पोलिसांना सापडलेला नाही. आता त्याला फरार म्हणून घोषित करीत त्याच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी करून ती तातडीने जप्त करावी. बोठे हा औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो. येथेही पोलिसांनी लक्ष ठेवावे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी बोठे याचा तातडीने शोध घेऊन सर्व आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी लगड यांनी केली आहे.

बोठे याच्या संपर्कातील व्यक्तीची चौकशी

बोठे फरार असला तरी जरे हत्याकांडाचा पोलीस गांभीर्याने तपास करीत आहेत. घटनेच्या आधी व त्यानंतर बोठे हा सर्वाधिक काळ ज्यांच्या संपर्कात होता त्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस बोठे याच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Investigate Bothe's Honeytrap