टाकळी लोणार येथे कृषी शास्त्रज्ञाकडून कांदा मळ्यांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:32+5:302021-01-14T04:17:32+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकरी चंद्रकांत घेरडे यांच्या कांदा मळ्याची कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्ही. आर. जोशी व ...

Inspection of onion orchards by an agricultural scientist at Takli Lonar | टाकळी लोणार येथे कृषी शास्त्रज्ञाकडून कांदा मळ्यांची पाहणी

टाकळी लोणार येथे कृषी शास्त्रज्ञाकडून कांदा मळ्यांची पाहणी

श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी लोणार येथील शेतकरी चंद्रकांत घेरडे यांच्या कांदा मळ्याची कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्ही. आर. जोशी व डॉ. प्रतीक साबळे यांनी कृषी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना कांदा पीक उत्पादन वाढीचा मंत्र दिला. डॉ. व्ही. आर. जोशी यांनी कांदा बीज प्रक्रिया रोपवाटिका तयार करणे, रोपवाटिकेतील प्रमुख रोग, त्यांचे एकात्मिक नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.

गुजरात राज्यातील दांतीवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रतीक साबळे यांनी ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर, कांदा लागवड आणि फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले. चंद्रकांत घेरडे यांनी ठिबक सिंचनवर ५ एकर कांदा लागवड केली आहे. त्यानंतर भानगाव येथे कांदा प्रक्षेत्रावर फुले समर्थ या वाणाची पाहणी केली. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक एम. टी. भोसले यांनी केले. यावेळी आजिनाथ फंड, बाबासाहेब फंड, नंदकुमार घोडके, अनिल औटी उपस्थित होते.

Web Title: Inspection of onion orchards by an agricultural scientist at Takli Lonar