शिवाजीनगर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:25+5:302021-08-17T04:26:25+5:30

केडगाव : शिवाजीनगर (केडगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, ...

Independence Day celebrations at Shivajinagar School | शिवाजीनगर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

शिवाजीनगर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

केडगाव : शिवाजीनगर (केडगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.

शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, आरोग्य सेविका ज्योती तोडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थितांनी वसुंधरा शपथ घेतली. आरती थोरवे, क्रांती पवार, आशा लंके, पार्वती कोलते, मीना जाधव, चंद्रकला कोतकर, सुरसे आदी उपस्थित होते.

शाळेतील मुलांनी ऑनलाइन भाषणे केली. यावेळी वेशभूषा, नाट्यछटा, रांगोळी आदी उपक्रम राबविण्यात आले. शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. आरोग्य सेविका ज्योती तोडमल यांनी कोरोनाकाळात घ्यावयाच्या काळजीबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

---

१६ शिवाजीनगर शाळा

शिवाजीनगर (केडगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

Web Title: Independence Day celebrations at Shivajinagar School