शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एकरी उत्पादन वाढवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी (दि. ११) २०१९-२०२० या गळीत हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ...

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी (दि. ११) २०१९-२०२० या गळीत हंगामात उसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपतराव गोडगे, मीनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव यादव, संभाजी वाकचौरे, दादासाहेब कुटे, सुरेश झावरे, भास्करराव आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, दूध आणि ऊस हे शाश्‍वत उत्पादन आहे. मात्र, शेतकऱ्यांनी त्याकडे व्यावसायिकतेतून पाहणे गरजेचे आहे. कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचा लाभ त्या शेतकऱ्यांना होईल. कार्यक्षेत्रात जास्त उत्पादन झाल्याने बाहेरील ऊस आणताना त्या वाहतुकीचा खर्च कमी होऊन उसाची रिकव्हरीही वाढेल.

प्रास्ताविक कार्यकारी संचालक घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष हासे यांनी आभार मानले. अण्णा राहिंज, सीताराम वर्पे, केशव दिघे, किरण कानवडे, ॲड. शरद गुंजाळ, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.

....

या शेतकऱ्यांचा सन्मान

रवींद्र भोकनळ (निमज), रोहिदास पवार (राजापूर), भास्कर गोपाळे (सुलतानपूर), मुरलीधर वर्पे (कनोली), लक्ष्मण गुंजाळ (खांडगाव), त्र्यंबक देशमुख (मंगळापूर), भाऊसाहेब येवले (मेहेंदुरी), जिजाभाऊ शिंदे (ओझर खु), शिवाजी वर्पे (संगमनेर खुर्द), दगडू बंगाळ (मेहेंदुरी), सुधाकर नवले (औरंगपूर), भास्कर आरोटे (मेहेंदुरी) या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.