छिंदम बंधुंच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:53+5:302021-09-21T04:22:53+5:30
श्रीपाद व श्रीकांत यांना १५ सप्टेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने जबरी चोरी व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक ...

छिंदम बंधुंच्या पोलीस कोठडीत वाढ
श्रीपाद व श्रीकांत यांना १५ सप्टेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने जबरी चोरी व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयाने या दोघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. कोठडीची मुदत संपल्याने या दोघांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. शहरातील दिल्लीगेट येथील टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रीपाद व श्रीकांत यांच्यासह इतर ३० ते ४० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. छिंदम बंधुंसह त्यांच्या साथीदारांनी ९ जुलै, २०२१ रोजी दुपारी दिल्लीगेट येथे बोडखे यांना जातिवाचक शिवीगाळ करत, त्यांच्या ज्यूस सेंटरमधील साहित्य फेकून दिले. यावेळी श्रीपाद छिंदम याने टपरीच्या गल्ल्यातील ३० हजार रुपये हिसकावून घेतले, तसेच टपरी जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकली, अशी फिर्याद बोडखे यांनी दिली होती.