शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने रस्ता लूट टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST

कर्जत : नगर-सोलापूर महामार्गावर बनपिंपरी ते घोगरगाव दरम्यान ट्रक चालकाला लुटण्यासाठी लुटारूंची टोळी तयार होती. परंतु, वकील, पोलीस, चालक ...

कर्जत : नगर-सोलापूर महामार्गावर बनपिंपरी ते घोगरगाव दरम्यान ट्रक चालकाला लुटण्यासाठी लुटारूंची टोळी तयार होती. परंतु, वकील, पोलीस, चालक यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रस्ता लुटीचा प्रसंग टळला. कर्जतकरांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कौतुक केले.

शुक्रवारी (दि.२३) रात्री अकराच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग भांडवलकर, ॲड. शुभम दीपक भंडारी, चालक सुशील देवगिरी आणि त्यांच्या सोबत असणारे तिघे जण हे सर्व न्यायालयाच्या कामानिमित्त नगर आणि नंतर श्रीरामपूरला गेले होते. सर्व काम आटोपून नगरवरून कर्जतकडे निघण्यास त्यांना उशीर झाला. कर्जतच्या दिशेने येत असताना बनपिंपरी-घोगरगावच्या मध्ये नगरच्या दिशेने थांबलेला ट्रक (केए ५६ बीझेड २३७५) आणि ट्रकच्या पुढे नंबर नसलेली दुचाकी थांबलेली दिसली. त्यावेळी पांडुरंग भांडवलकर यांनी चालक सुशील देवगिरी यांना वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबताच दुचाकीवरील व्यक्ती म्हणाला ‘जाऊ द्या, जाऊ द्या काही नाही’ पण भांडवलकर यांना शंका आली.

त्यांनी ट्रकचे निरीक्षण केले. त्यांना ट्रकमध्ये क्लिनर आणि चालकाच्या बाजूने दोघे जण असल्याचे दिसले. पोलीस कर्मचारी भांडवलकर वाहनातून उतरून दुचाकीकडे गेले. ट्रकमधून एक जण उतरला. त्याच्या हातात धारदार शस्त्र दिसताच ॲड. शुभम भंडारीही वाहनातून उतरले व चालकाला वाहन वळवा असे सांगितले. ते पाहता लुटारू दुचाकीवर बसला. त्यानंतर तिसरा लुटारूही पळत येऊन दुचाकीवर बसताच ते वेगाने नगरच्या दिशेने निघून गेले. नंतर त्यांनी ट्रक चालकाला धीर देत जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले. त्यामुळे लुटीचा प्रसंग टळला.