चौदा शिक्षकांना आदर्श पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST2021-09-05T04:26:15+5:302021-09-05T04:26:15+5:30

अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक विभागीय कार्यालयाकडून जाहीर झाले आहेत. ...

Ideal award to fourteen teachers | चौदा शिक्षकांना आदर्श पुरस्कार

चौदा शिक्षकांना आदर्श पुरस्कार

अहमदनगर : जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक विभागीय कार्यालयाकडून जाहीर झाले आहेत. तेरा शिक्षक आणि एक केंद्रप्रमुख अशा १४ शिक्षकांचा पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे. रविवारी (दि. ५) शिक्षक दिन साजरा होत आहे. या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर झाले.

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. प्रत्येक तालुक्यातून पुरस्कारासाठी तीन नावे प्राप्त झाली. त्यामधून पुरस्कार निवड समितीने तालुकानिहाय नाव निवडून ही यादी अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविली होती. शनिवारी सायंकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्षक पुरस्कारार्थीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

पुरस्कारप्राप्त शिक्षक असे : हरिबा लक्ष्मण चौधरी (जि.प. शाळा सावरकुटे, अकोले) वृषाली सुनील कडलग (जि.प. देशमुख मळा, संगमनेर), किरण वाल्मिक निंबाळकर, (जि.प. शाळा कारवाडी, कोपरगाव), कल्पना कौतिक बाविस्कर (जि.प. मालवियवाडी, श्रीरामपूर), विठ्ठल रघुनाथ काकडे (जि.प. गाढेवाडी, राहुरी), रवींद्र बाबासाहेब पागिरे, (जि.प. शाळा, सौंदाळा, नेवासा), भरत गोवर्धन कांडकर (नांदूर विहिरे, शेवगाव), तुकाराम तुळशीराम अडसूळ (जि.प. शाळा गीतेवाडी, पाथर्डी), पांडुरंग लक्ष्मण मोहळकर (जि.प. शाळा पाडळी, जामखेड), उज्ज्वला धनाजी गायकवाड (जि.प. शाळा तिखी, कर्जत), राजेंद्र विठ्ठल पोटे (जि.प. शाळा, अरणगाव, श्रीगोंदा), रामदास राघू नरसाळे (जि.प. शाळा पोखरकर झाप, पारनेर), ज्योती मारुती भोर, (जि.प. शाळा दत्तनगर, नगर). तालुकानिहाय शिक्षकांच्या या पुरस्काराबरोबरच केंद्रप्रमुख गटातील पुरस्कारसाठी शेवगाव तालुक्यातील शेख युसूफ नमदभाई यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Ideal award to fourteen teachers