शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

By admin | Updated: October 3, 2014 23:56 IST

शिर्डी: शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़

शिर्डी: सार्इंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले या श्रद्धेतून शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पाऊणशे पोती धान्य व एकोणसाठ हजाराच्या रकमेचे दान भिक्षा झोळीत टाकले़ शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़त्रिसदस्यीय समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव, उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्यासह अनेक उच्चपदस्थ आपले पद, प्रतिष्ठा विसरुन आत्मिक आनंद मिळवून देणाऱ्या व अहंकार गळून पाडणाऱ्या या कार्यक्रमात भिक्षा झोळी घेवून सहभागी झाले होते़ पहाटे साईप्रतिमेच्या व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाच्या मुख्य दिवसाचा श्रीगणेशा झाला़द्वारकामाईत सुरू झालेल्या अखंड पारायण सोहळ्याची सांगता झाली़ यानंतर भिक्षा झोळीचा तर माध्यान्हीला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते आराधना विधीचा कार्यक्रम संपन्न झाला़दुपारी ह़भ़प़मनोहर दिक्षित यांच्या कीर्तनाबरोबरच सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला़या कार्यक्रमांना भाविकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली़ साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त साईनगरी नटली आहे़विविधरंगी फुलांनी सजवलेली,सुवर्णालंकाराने नटलेली,चित्ताकर्षक वस्त्रांनी लपेटलेली सार्इंची समाधीवरील मनमोहक मूर्ती भाविकांचे भान हरपवणारी होती़ रात्री साडेसात ते दहा वाजेपर्यंत सत्यनारायण नायर,भोपाल यांचा साईभजन संध्येचा कार्यकम झाला तर रात्री नऊ वाजता शहरातून सार्इंची सुवर्ण रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ दानशूर साईभक्तांच्या देणगीतून प्रसादालयात भाविकांना मोफत मिष्टान्न भोजन देण्यात आले़ मंदिर रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते़ शनिवारी सकाळी गुरूस्थान मंदिरातील रूद्राभिषेकानंतर दहा वाजता ह़भ़प़मनोहर दीक्षित यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल़ (तालुका प्रतिनिधी)