सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:31+5:302021-08-26T04:23:31+5:30

सोशल मीडियामुळे सध्या खेडोपाडी आणि गल्लीबोळात भाईगिरीचे पेव फुटले आहे. वाढविलेली दाढी, अंगात पांढरे कपडे, हातात सोने-चांदीचे ब्रेसलेट अशी ...

Hooliganism on social media! | सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी!

सोशल मीडियामुळे सध्या खेडोपाडी आणि गल्लीबोळात भाईगिरीचे पेव फुटले आहे. वाढविलेली दाढी, अंगात पांढरे कपडे, हातात सोने-चांदीचे ब्रेसलेट अशी सजावट असलेला नेता रात्री रस्त्यावर तलवारीने केक कापतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसॲपवर या जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले जातात. या नेत्यांचे फॅन, फॉलोव्हर्स बऱ्यापैकी असतात. कधीकधी याच पोस्टवरील कमेंटवरून वाद उद्भवून हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. अशा सोशल गुंडागर्दीसंदर्भात तक्रार केल्यानंतर स्थानिक पोलीस अथवा सायबर पोलिसांकडून कारवाई होते. मात्र हे कधीतरीच घडते. त्यामुळे पाेलिसांनी स्वत:हून नजर ठेवून अशा स्टंटबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

--------------------------

कट्टा तलवार अन् चाकू

तलवारीने केक कापताना देशी कट्टा वापरणे, चाकू व इतर हत्यारांचे फाेटाे व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल केले जातात. अशा पद्धतीने फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर मागील काही वर्षांत पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांना वचक बसला आहे. चुकीच्या फोटोंना लाइक, कमेंट करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करू शकतात.

---------------------

सोशल मीडियावर सायबर पोलिसांची नजर असते. वाढदिवस साजरा करताना कुणी तलवार अथवा इतर हत्याराचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर तत्काळ कारवाई केली जाते. तसेच सोशल मीडियावर अशा स्वरूपाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांसंदर्भात कुणी तक्रार केली तर स्थानिक पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करतात.

- प्रतीक कोळी, उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन

Web Title: Hooliganism on social media!