अहमदनगर : गुरुपौर्णिमेनिमित्त ‘स्नेह ७५’ या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुपतर्फे भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या शिक्षकांचा शनिवारी सन्मान करण्यात आला.
शाळेचे माजी शिक्षक रजनी रसाळ, एस. आर. जोशी, प्रकाश कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अनंत दसरे, प्रभाकर वाघ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वनाथ पोंदे, अजित चाबुकस्वार, ईश्वर सुराणा, किशोर रेणावीकर, डॉ. प्रवीण रानडे, किशोर रेणावीकर, अभय गांधी, दिनेश गुगळे, रजनी बगाडे, रजनी भंडारे, जया लवार, विनोद सोळंकी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विश्वनाथ पोंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण रानडे यांनी केले. अजित चाबुकस्वार यांनी सर्व शिक्षकांचा परिचय करून दिला. किशोर रेणावीकर यांनी आभार मानले.
---
फोटो -२५ फिरोदिया स्कूल
माजी विद्यार्थ्यांच्या ‘स्नेह ७५’च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त भाउसाहेब फिरोदिया शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वनाथ पोंदे, अजित चाबुकस्वार, ईश्वर सुराणा, किशोर रेणावीकर, डॉ. प्रवीण रानडे आदी उपस्थित होते.