हंगे विद्यालयात विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:25+5:302021-09-24T04:25:25+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील हंगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी, शिक्षिका, ...

हंगे विद्यालयात विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षकांचा सन्मान
सुपा : पारनेर तालुक्यातील हंगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षक, देणगीदार यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. स्मिता कोल्हे, ग्रामपंचायत सदस्या माया साळवे, विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य युवराज दळवी, बबनराव साठे, जगदीप शिंदे, अरुण लोंढे, सरपंच बाळासाहेब दळवी, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जगदीप साठे, गणेश साळवे, सोपानराव दळवी, राजेंद्र दळवी, शिवाजी नगरे, राजेंद्र लोंढे, मुंगशीचे सरपंच अनिल करपे, आदर्श शिक्षक प. स. सोंडकर, ज्ञानदेव लंके, चंद्रकांत काळे, नाईकवाडी, बाबा शिंदे, सुदाम दळवी आदी उपस्थित होते. विद्यालयातील सेवक अरुण लोंढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनी राधा नरहरी बुंदे, कलाशिक्षक रोहिदास भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे यांच्या प्रेरणेतून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा साकारली. त्या विद्यार्थिनीस आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले. उपशिक्षिका सुवर्णा भोर व रमेश दरेकर यांना आदर्श शिक्षिका व शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षक सुदर्शन धस यांना डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल सन्मानित केले. देणगीदार शकुंतला गायकवाड यांचाही या वेळी सन्मान झाला. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र टापरे यांनी आभार मानले.