काळेवस्ती येथे घरोघरी शाळा उपक्रम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:53+5:302021-07-22T04:14:53+5:30

याअंतर्गत तन्वी दत्तात्रय काळे या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरातच तिच्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन विस्तार अधिकारी विद्यादेवी ...

Home school activities started at Kalevasti | काळेवस्ती येथे घरोघरी शाळा उपक्रम सुरू

काळेवस्ती येथे घरोघरी शाळा उपक्रम सुरू

याअंतर्गत तन्वी दत्तात्रय काळे या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरातच तिच्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन विस्तार अधिकारी विद्यादेवी सुंबे यांच्या हस्ते व भानस हिवरे केंद्राचे प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कोरोनाकाळात १०० टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी काळेवस्ती शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण केली. प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याच्या स्वतंत्र संचाचे मोफत वाटप करून नियमित गृहभेटीद्वारे घरोघरी शाळा हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे सुरू केला.

मुख्याध्यापिका वृषाली घोडके यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका विधाटे, उपसरपंच अय्याज देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मोहिटे, ठाणगे, मकासरे ्आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी मुख्याध्यापिका वृषाली घोडके व उपशिक्षिका नीता आनंदकर यांचे हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले.

210721\img-20210721-wa0040.jpg

नेवासा फाटा : घरोघरी शाळा उपक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. विधाटे भानस हिवरे गावचे उपसरपंच अय्याज देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मोहिटे तसेच सौ. ठाणगे ,श्री.मकासरे होते.

Web Title: Home school activities started at Kalevasti