प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्वसाधारण सभा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:06+5:302021-02-23T04:33:06+5:30

अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेत प्रत्यक्षातील सर्वसाधारण सभा झालेली नाही. नगरसह राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करून निवडणुका, समारंभ ...

Hold general meetings with preventive measures | प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्वसाधारण सभा घ्या

प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सर्वसाधारण सभा घ्या

अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेत प्रत्यक्षातील सर्वसाधारण सभा झालेली नाही. नगरसह राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करून निवडणुका, समारंभ आणि अन्य बाबी सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने आणि पदाधिकारी यांनी गुरूवारी होणारी सर्वसाधारण सभा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्यावी. केवळ कोरोनाचे कारण सांगून सभा टाळण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेत ऑनलाईन सभा घेण्यात आलेली नाही. परिमाणी जिल्हा परिषदेचे कामकाज जवळपास ठप्पच झाले आहे. सभा होत नसल्याने विविध प्रश्नांवर सदस्यांना चर्चाच करता येत नाही. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोनासंबंधी सर्व उपाययोजन करून सर्वसाधारण सभा घ्यावी. पुन्हा कोरोनाच्या नावाखाली ऑनलाईन सभेचे भूत नाचविल्यास त्याचा फटका सदस्यांना आणि जनतेला बसणार आहे. कोरोनासंदर्भात असणारे सर्व नियम सदस्य आणि अधिकारी पाळणार असल्याने गुरूवारी होणारी सर्वसाधारण सभा अजेंडा आणि नियोजित ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात व्हावी, अशी अपेक्षा परजणे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Hold general meetings with preventive measures