शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रोखला

By admin | Updated: June 18, 2014 01:23 IST

तिसगाव : रस्ते, पाणी, वीज याप्रश्नी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील गावकऱ्यांनी मंगळवारी कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

तिसगाव : रस्ते, पाणी, वीज याप्रश्नी पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील गावकऱ्यांनी मंगळवारी कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मंगळवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.सरपंच सविता ससे, उपसरपंच हरिश्चंद्र मरकड, अशोक मरकड, आसाराम ससे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सुमारे वर्षापूर्वी वेळोवेळी निवडुंगे येथे झालेल्या आंदोलनादरम्यान समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. आश्वासने दिलेल्या लेखीप्रतीच समोर ठेवल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना निरुत्तर व्हावे लागले.पाणी योजनेतील दोष, दुरुस्ती त्रूटी यावर आजच तात्काळ मात करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन शाखा अभियंता बबन खोले, उपअभियंता आर.एम. फुंदे, तहसीलदार एस.बी. भाटे यांनी संयुक्तरित्या दिल्यानंतर आंदोलक रस्त्यावरुन बाजुला झाले. दरम्यान, शाखा अभियंता बबन खोले यांनी २७ मार्च २०१२ रोजी निवडुंगे येथे याच प्रश्नावरुन झालेल्या रास्ता रोकोप्रसंगी याच प्रकारचे लेखी आश्वासन दिले होते. तर आजच्या या आंदोलनालाच तेच हजर नव्हते. त्यामुळे नागरिकांचा सर्वाधिक रोषही त्यांच्यावर होता.तहसीलदार एस.बी. भाटे यांनी भ्रमणध्वनीवरुन शाखा अभियंता खोले यांना सुनावले. त्यानंतर खोले आंदोलनस्थळी आले. त्यावेळी महिलांनीच त्यांच्यावर तोंडसुख घेतले. तीन दिवसात बृहत वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वस्वी सरपंच ससे, गयाबाई वाघमोडे, मुक्ताबाई सातपुते, अलका जाधव, लिलाबाई बोरुडे, भारती घोडके, निर्मला भवार, ग्रामपंचायत सदस्य शंकर गोंधणे, चंद्रकांत मरकड, विठ्ठल मरकड, खंडू कोलते, भाऊसाहेब साळवे यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर) आंदोलकांची माणुसकीज्वलंत वीज, पाणी प्रश्नी आक्रमक भूमिका असलेल्या आंदोलकांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहने, रुग्णवाहिका तसेच महिलांची दुचाकी वाहने यांना मात्र स्वयंस्फूर्तीने वाट करुन दिली.निवडुंगे प्रादेशिक पाणी योजनेवरील बेकायदा नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश पंचायत समितीने दोन वर्षापूर्वीच दिले आहेत. तरीही आदेशाचे पालन होत नाही. याबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून अशा जनभावनेचा रोष ओढवणार नाही.- आसाराम ससे, ग्रामपंचायत सत्ताधारी, आघाडीचे नेते