शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने खरिपातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

निंबळक : नगर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. ...

निंबळक : नगर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्याचा लाभ पिकांना होणार आहे. त्यामुळे खरिपातील पिके चांगली येणार आहेत. नगर तालुक्यात अपेक्षित क्षेत्राच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, पावसाने उसंत घेऊन मागील ३-४ दिवसांत तो पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप पेरणीला त्यामुळे जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील मूग पिकाची गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, नारायण करांडे यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.

कापसे म्हणाले, सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, कापूस अशा खरिपातील पिकांची पेरणी झाली. मात्र पेरणीनंतर पाऊस लांबल्याने चिंता होती. आता पाऊस आल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पूर्वीच्या तुलनेत मागील २ वर्षांपासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे कापसे यांनी सांगितले.

नवले म्हणाले, तालुक्यात खरिपाची ८५ टक्के पेरणी झाली आहे. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी ज्यांची पेरणी राहिली असेल, त्यांना आता सोयाबीन व तूूर पेरणीची संधी आहे.