तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची जोरदार बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:19+5:302021-06-29T04:15:19+5:30

अकोले : शहर परिसरात रविवारी २३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद सोमवारी सकाळी झाली. घाटघरला २०, तर रतनवाडीत अवघा ७ ...

Heavy rainfall in the eastern part of the taluka | तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची जोरदार बॅटिंग

तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची जोरदार बॅटिंग

अकोले : शहर परिसरात रविवारी २३ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद सोमवारी सकाळी झाली. घाटघरला २०, तर रतनवाडीत अवघा ७ मिलिमीटर पाऊस झाला असून भंडारदरा पाणलोटक्षेत्राला मोठ्या पावसाची आस लागून आहे.

दरम्यान कळस व अकोले परिसराला सोमवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपले. तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मात्र, पावसाचे आगार असलेल्या तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढलेला नाही. भंडारदरा धरणात १ जूनपासून २८ दिवसांत १ हजार २३६ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. पाणलोटातील मान्सूनचा पाऊस अद्याप दरवर्षीप्रमाणे रुद्रावतारी बरसता झालेला नाही. भात रोपे तरारली असली तरी आवणीला वेग येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

रविवारी झालेल्या पावसाची सोमवारी सकाळी झालेली नोंद व १ जूनपासून बरसलेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये भंडारदरा- ११/३९८, घाटघर- २०/७५३, पांजरे- १२/४३७, रतनवाडी- ७/५७४, वाकी- ९/३४१, अकोले- २३ /२५९, निळवंडे- २१/१६६, आढळा- ५/५९

भंडारदरा ५ हजार २९०, निळवंडे १ हजार ४६ तर आढळा धरणात ४६३ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. निळवंडे धरणातून शेती आवर्तन ९०० क्युसेक विसर्गाने सुरू आहे. कळस येथे प्रवरा नदी विसर्ग १०९६ क्युसेकने सुरू आहे. यात दुपारच्या पावसामुळे वाढ झाली आहे.

सोबत फोटो

Web Title: Heavy rainfall in the eastern part of the taluka