शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रिफ दोन दिवस दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:26 IST

------------------ ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन अहमदनगर : जिल्ह्यातील वृद्धांसाठी (राष्ट्रीय हेल्पलाइन) एल्डर लाइन-१४५६७ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या ...

------------------

ज्येष्ठांसाठी हेल्पलाइन

अहमदनगर : जिल्ह्यातील वृद्धांसाठी (राष्ट्रीय हेल्पलाइन) एल्डर लाइन-१४५६७ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी सामाजिक न्याय आणि अधिकरिता मंत्रालय, भारत सरकार, मार्फत राष्ट्रीय हेल्पलाइन सर्व राज्यात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय, सामाजिक संरक्षण संस्था (एनआयएसडी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर हेल्पलाइन टोल फ्री स्वरूपात आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार दिला जाणार आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी सांगितले.

----------------

प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण

अहमदनगर : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये घ्यावयाच्या प्रशिक्षण कोर्सेसबाबत अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय अथवा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून १२० जणांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्यामध्ये इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, जनरल ड्युटी असिस्टंट, फ्लेबोटोमिस्ट यांचा समावेश असेल. तसेच होम हेल्थ एड, ॲडव्हॉन्स क्रिटिकल केअर, मेडिकल ईक्युप्मेंट टेक्नॉलॉजि असिस्टंट यापैकी एकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सावेडी येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

---------------

ग्रंथपाल दिन साजरा

अहमदनगर : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ . शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. संगीता निमसे यांनी रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव केला. ग्रंथपाल दिनानिमित्त त्यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत, प्रास्ताविक तांत्रिक सहायक हनुमान ढाकणे यांनी केले. आभार ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले. यावेळी शैलेश घेगडमल आदींसह वाचक उपस्थित होते.