गुंडेगावचा रामेश्वर श्रावणी सप्ताह साध्या पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST2021-08-22T04:24:26+5:302021-08-22T04:24:26+5:30

केडगाव : गुंडेगावचे आराध्य ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिराचा वार्षिक श्रावणी हरिनाम सप्ताह १६ ते २३ ऑगस्ट या कालावधीत ...

Gundegaon's Rameshwar Shravan week celebrated in a simple way | गुंडेगावचा रामेश्वर श्रावणी सप्ताह साध्या पद्धतीने साजरा

गुंडेगावचा रामेश्वर श्रावणी सप्ताह साध्या पद्धतीने साजरा

केडगाव : गुंडेगावचे आराध्य ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिराचा वार्षिक श्रावणी हरिनाम सप्ताह १६ ते २३ ऑगस्ट या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात पारंपरिक पारायणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात दररोज टाळ, वीणा वाद्ये वाजवून अखंड नामस्मरण केले जात आहे.

श्रावणी सप्ताहानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविक हजेरी लावत आहेत; परंतु सध्या कोरोना महामारीच्या वातावरणामुळे हा श्रावणी सप्ताह अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे रामेश्वर मंदिर कमिटीचे सदस्य गणेश हराळ यांनी सांगितले. दरवर्षी होणारा अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. अगदी साध्या पद्धतीने देवाला गोड नैवेद्य वाढवून तसेच पालखी प्रदक्षिणा वाजतगाजत न काढता साध्या पद्धतीने काढली जाणार आहे. यासाठी महामुनी गुरुजी, रामदास हराळ, सदाशिव चव्हाण, बाळासाहेब हराळ, अशोक देशमुख, पंडित नाईक, मनोहर पवार, काका माने, जयसिंग जाधव, बाळासाहेब भापकर आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Gundegaon's Rameshwar Shravan week celebrated in a simple way