शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:25+5:302021-08-26T04:23:25+5:30

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे भागीनाथ आसणे यांच्या वस्तीवर मका पिकाच्या मार्गदर्शनाविषयी शेती शाळेचे मंगळवारी ( दि. २४ ) ...

Guidance to farmers from the farm | शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतीशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोपरगाव : तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे भागीनाथ आसणे यांच्या वस्तीवर मका पिकाच्या मार्गदर्शनाविषयी शेती शाळेचे मंगळवारी ( दि. २४ ) आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी मका व सोयाबीन पिकाचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व तसेच मका, सोयाबीन पिकांपासून तयार होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांबाबत मार्गदर्शन केले.

कृषी सहायक वाबळे यांनी प्रास्ताविक केले, तसेच उपस्थित महिलांना जीवामृत करण्याविषयी प्रात्यक्षिक व माहिती दिली. यावेळी सहायक कृषी अधिकारी या यूट्यूब चॅनलवर अहमदनगर जिल्ह्यातून बीज प्रक्रिया व्हिडिओ अपलोड करून सहभागी व विजेते झालेले शेतकरी भागीनाथ बाबासाहेब आसणे, उत्तमराव बादशहा, प्रीतेश पैठणकर या शेतकऱ्यांचे पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसणे, सरपंच माधुरी आहेर व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी सहायक तुषार वसईकर यांनी आभार मानले.

250821\img-20210825-wa0026.jpg

फोटो२५-  शेतीशाळा - कोपरगाव 

Web Title: Guidance to farmers from the farm