शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:19 IST

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असतानाच आता याचा फटका तालुक्यातील प्रशासकीय कारभाऱ्यांनाही बसला आहे.

शेवगाव : वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, शेवगावकर हैराण झालेले असताना, या गलथान कारभाराचा 'शॉक' प्रशासकीय अधिकाऱ्यांना बसला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला ऑनलाईन हजर राहाता न आलेल्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली आहे.
    शुक्रवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड १९ संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ऑनलाईन आढावा बैठक बोलावली होती. बैठकीला प्रांताधिकारी देवदत्त केकाण, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, पाथर्डीचे तहसीलदार शाम वाढकर हे उपस्थित होते. मात्र शहरात सकाळपासून विज नसल्याने कार्यालयातील इलेट्रॉनिक सर्व उपकरणे बंद पडली होती. बॅटरीवर चालणाऱ्या इन्व्हर्टरचा बॅकअप पॉवर संपला होता. अर्ध्या तालुक्यात विज पुरवठा खंडीत असल्याने बहुतांशी आस्थापना, कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक साधनांवर चालणारे सर्व व्यवहार बंद होते. तहसिल कार्यालयातही विज नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी विज वितरण कंपनीला संपर्क साधून विज पुरवठा खंडीत असल्याचे कळवले तसेच विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याची माहिती विचारली. परंतु, त्यांना अहमदनगरवरुन विज पुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी ऑनलाईन बैठकीला शेवगाव विभागातील अधिकारी हजर नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधत चांगलेच सुनावताना 'त्या' अधिकाऱ्यांना तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याचे फर्मान सोडले. वरिष्ठांचा आदेश मिळताच विनाविलंब तीनही अधिकारी अहमदनगरकडे रवाना झाले. गत सोमवार ( दि. ६ ) रोजीही विज पुरवठा नसल्याने 'त्या' अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयShevgaonशेवगावPathardiपाथर्डी