समर्थ शाळेत बारावीतील गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:17+5:302021-08-27T04:24:17+5:30

प्रशालेत प्रीती सुद्रिक (९१.६७ टक्के, प्रथम), सानिका घोरपडे (९१.१७ टक्के, द्वितीय) व तन्मय फलके (९०.३३ टक्के, तृतीय), वैष्णवी शितोळे ...

Glory to the meritorious students of 12th standard in Samarth School | समर्थ शाळेत बारावीतील गुणवंतांचा गौरव

समर्थ शाळेत बारावीतील गुणवंतांचा गौरव

प्रशालेत प्रीती सुद्रिक (९१.६७ टक्के, प्रथम), सानिका घोरपडे (९१.१७ टक्के, द्वितीय) व तन्मय फलके (९०.३३ टक्के, तृतीय), वैष्णवी शितोळे (९० टक्के, चतुर्थ) व समृद्धी भारताल (८९.३३ टक्के, पाचवी) यांनी यश संपादन केले आहे. त्यांचा संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी ल. दि. सोनटक्के, सेक्रेटरी प्र. स. ओहोळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शालेय समितीचे चेअरमन ॲड. किशोर देशपांडे, चेअरमन ह. वा. इनामदार, व्हा. चेअरमन डी. आर. कुलकर्णी, खजिनदार सतीशचंद्र कुलकर्णी, कार्यकारी सदस्य सुरेश क्षीरसागर, श्रीपाद कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, विकास सोनटक्के, प्राचार्य श्रीमती संगीता जोशी, पर्यवेक्षिका संगीता सोनटक्के, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. प्रशालेने यंदाही प्रशालेचा उत्तुंग यशाचा चढता आलेख कायम ठेवला आहे, असे प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

----

फोटो- २६ समर्थ स्कूल

बारावीच्या परीक्षेतील गुणवंतांचा सावेडीतील समर्थ शाळेत गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Glory to the meritorious students of 12th standard in Samarth School