शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार करणार्‍यास जन्मठेप

By admin | Updated: December 31, 2015 14:03 IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी किशोर शंकर पालवे (वय २0) याला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

 अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी किशोर शंकर पालवे (वय २0, रा. मेहेकरी, ता. जि. अहमदनगर) याला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथे नेऊन मार्च २0१४ मध्ये अत्याचार केला होता.दहावीची परीक्षा देण्यासाठी अल्पवयीन मुलगी (वय १५) जात असताना किशोर पालवे याने शाळेजवळ येऊन मुलीशी गोड बोलून लग्नाची मागणी घातली. सदर मुलीने लग्नास नकार दिल्याने किशोर याने तिला मोटारसायकलवर बसवून खुल्ताबाद (जि. औरंगाबाद) येथील एका लॉजवर तसेच वाळुंज (जि. औरंगाबाद) येथे नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासी अधिकारी एस. एन. नरवडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर खटला सुरू असताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे-गायके यांनी १६ साक्षीदार तपासले. कापसे यांचा युक्तीवाद, सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने किशोर पालवे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम २0१२ प्रमाणे आरोपीला दोषी धरले. तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी कलम ३६६ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-२0१२ अन्वये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यास न्यायालयाने प्रथमच जन्मठेप ठोठावली आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी दिली. अत्याचारीवर जरब बसविणारा हा कायदा असून यापुढे असे गुन्हे होवू नयेत, यासाठी आरोपींना अशा शिक्षा होणे गरजेच्या असल्याचे गायके म्हणाल्या. (प्रतिनिधी)