शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गणपती चालले गावाला़

By admin | Updated: September 7, 2014 23:47 IST

अहमदनगर : महापालिकेची गणेश विसर्जनासाठी सुरू असलेली तयारी पूर्ण झाली आहे़

अहमदनगर : महापालिकेची गणेश विसर्जनासाठी सुरू असलेली तयारी पूर्ण झाली आहे़ शहरासह सावेडी उपनगरात बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, मिरवणूक मार्गावर पॅचिंग करण्यात आले आहे़ त्यामुळे बाप्पांच्या मिरवणुकीतील खड्ड्यांचे विघ्न काहीअंशी दूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे़आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत़ सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग सुरू आहे़आता सर्वांनाच वेध लागले आहेत, ते बाप्पांच्या मिरवणुकीचे़ मिरवणुकीची जय्यत तयारी मंडळ समितीकडून सुरू आहे़ शहरासह उपनगरांत २२५ मंडळांनी तसेच घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे़ सोमवारी लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विसर्जनाची तयारी सुरू होती़महापालिकेने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, दिवा बत्तीची सोय आणि खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ ही मोहीम पूर्ण झाली आहे़ रामचंद्र खुंट ते दिल्लीगेट परिसरातील रस्त्यांवरील खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्यात आले आहेत़ बंद पडलेले पथदिवेही सुरू करण्यात आले असून, मिरवणूक मार्गावर लखलखाट झाला आहे़ मिरवणूक मार्ग आणि विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते़ त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता़ प्रमुख रस्त्यांची डागडुजी करून झाली आहे़अतिक्रमण विरोधी पथकाकडून मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे़ रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्याचे ढिग उचलले आहेत़ जाहिरात फलक उतरवून घेण्यात आले आहेत़ विद्युत वाहक तारा मिरवणुकीत अडथळा निर्माण करतात, त्या तारा दुरुस्त करण्याची मागणी पुढे आली आहे़ मिरवणूक मार्गाची पाहणी करून दुरुस्ती केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)शहरासह सावेडी उपनगरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत़तसेच रस्त्यावरील टपऱ्या, पथारीवाले हटविण्यात आले आहेत़ दिवाबत्तीचीही व्यवस्था करण्यात आली असून, शहरासाठी कल्याण महामार्गावरील बाळाजीबुवा विहीर येथे व्यवस्था करण्यात आली आहे़ तर सावेडी उपनगरात पाईपलाईन रस्त्यावरील यशोदानगर येथील विहीर येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे़ सोमवारी सकाळी पुन्हा मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे़-सुरेश इथापे, प्रमुख, अतिक्रमण विरोधी पथक