शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची लूटमार करणारी पारनेर तालुक्यातील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:35 IST

रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

अहमदनगर : रात्रीच्या वेळी प्रवाशांना कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत लूटमार करणारी चौघांची टोळी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रोड परिसरातून जेरबंद केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

शुभम भागाजी बुगे (रा. बुगेवाडी, ता. पारनेर), विनोद सुधाकर पाटोळे (रा. बहीरवाडी, ता. नगर) आकाश संतोष नायकोडी (रा. जामगाव, ता. पारनेर) व एक अल्पवयीन मुलगा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी ३ एप्रिल रोजी रात्री शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातून नाशिक येथील प्रवासाला कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेत त्याला मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटून नेले. त्यानंतर याच टोळीने पुन्हा ४ एप्रिल रोजी आष्टी येथील एका प्रवाशाला कारमध्ये बसवून त्याची लूटमार केली होती. दरम्यान, या टोळीने नगर तालुका, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील अशीच लूटमार केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोलीस नाईक गणेश धोत्रे, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, योगेश भिंगारदिवे, सुमित गवळी, तानाजी पवार, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :ahmednagar policeअहमदनगर पोलीसParnerपारनेर