शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात मोफत जेवण वाटपाची परवानगी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याची तयारी असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ...

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याची तयारी असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कृष्णा भोजनालयाचे संचालक साईनाथ घोरपडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

कृष्णा भोजनालयाच्या वतीने मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये गरजूंना मोफत भोजन देण्यात आले. या वर्षीही मोठ्या प्रमाणात रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये येत आहेत. रुग्णांना भोजनाची व्यवस्था होते, मात्र त्यांच्या नातेवाईकांचे भोजनाअभावी मोठे हाल होतात. लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर १०० गरजूंना रोज मोफत भोजन देण्यास आपण तयार आहोत, परंतु त्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने जिल्हा रुग्णालय आवारात थोडी जागा तसेच भोजन वाटप याची परवानगी द्यावी, अशी मागणी घोरपडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

हे पत्र देऊन बारा दिवस झाले; मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घोरपडे यांना काहीही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. गरजूंना मोफत भोजन देण्याचे दातृत्व घोरपडे दाखवत आहेत; मात्र प्रशासनाच्या थोड्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी केली आहे. यातून बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रात्रीच्या तसेच दिवसाच्या भोजनाची सोय होणार आहे. त्यामुळे ही परवानगी मिळावी, असेही घोरपडे यांनी पत्रात म्हटले आहे.

--------------