शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

नगर बाह्यवळण रस्त्याचे चौपदरीकरण दोन वर्षांत होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी ...

केडगाव : नगर शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राष्ट्रीय महामार्गांतर्गत चौपदरीकरण होणार आहे. तब्बल १ हजार २६ कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या रस्त्याचे काम येत्या २ वर्षांत पूर्ण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि.२२) दुपारी ३.३० वाजता वाळुंज येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नगर विभागाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण आदी उपस्थित राहणार आहेत.

नगर शहर हे विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गात मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या वाहतुकीमुळे नगर शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. अपघातही होत असल्याने शहराबाहेरून बाह्यवळण रस्ता (बायपास) करण्यात आला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाटापासून नगर-कल्याण रस्ता व नगर-पुणे रस्ता ओलांडून सोलापूर रस्त्यावरील वाळुंज येथपर्यंत तसेच नगर एमआयडीसी ते नगर-औरंगाबाद रस्ता असा हा बाह्यवळण रस्ता आहे.

----

सर्व महामार्ग चौकात होणार उड्डाणपूल

भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा मालकांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला आहे. भूसंपादनासाठीच्या मोबदल्याची रक्कम आणि डांबरी चौपदरीकरण, मध्य भागी रस्ता दुभाजक असे या कामासाठी तब्बल १ हजार २६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्यावर जेथे जेथे इतर महामार्ग गेलेले आहेत तेथे उड्डाणपूल केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दौंड रस्ता, सोलापूर रस्ता, औरंगाबाद रस्ता जामखेड रस्त्याचा समावेश आहे. या कामाची निविदा मुंबई येथील जी. एच. व्ही. कंपनीने भरलेली असून या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. दोन वर्षे कामाची मुदत आहे.

---

विखेंच्या पाठपुराव्यामुळे प्रक्रियेला वेग

बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपांतरित झाला असला तरी अगोदर त्याची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या बाह्यवळण रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची नेहमीच गर्दी असल्याने या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे यासाठी २०१५ पासून प्रक्रिया सुरु होती; मात्र डॉ. सुजय विखे खासदार झाल्यानंतर त्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. लष्करी हद्दीतून रस्त्याचे काम होण्यासाठी संरक्षण विभागाकडून त्यांनी मंजुरी मिळविली आहे. भूसंपादन प्रक्रियेलाही त्यांनी वेग दिला.

---

११ गावांच्या हद्दीत झाले भूसंपादन

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर नेप्तीजवळ नगर शहराची हद्द सुरू होते. तेथेच बाह्यवळण रस्ता केला आहे. या रस्त्याच्या दक्षिण व उत्तर दिशेने मिळून ११ गावातील १२२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले. ४८१ खातेदारांच्या जमिनी आहेत. यात अरणगावच्या ६५, बोल्हेगावच्या ६, केडगावच्या ९०, नालेगावच्या २६, नारायणडोहच्या २९, नेप्तीच्या ३७, निंबळकच्या ७२, सारोळा बद्दीच्या ६८, शहापूरच्या २, सोनेवाडी-अकोळनेरच्या ५, वाळुंजच्या ८० जणांच्या जमिनी आहेत.