..अखेर मांडवगण रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST2021-09-24T04:25:00+5:302021-09-24T04:25:00+5:30

श्रीगोंदा : शहरातील मांडवगण रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत ‘लोकमत’मध्ये गुरुवारी (दि. २३) वृत्त प्रसिद्ध होताच मोहन भिंताडे यांनी अडविलेले काम ...

..Finally, the work of Mandvagan road started under police protection | ..अखेर मांडवगण रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू

..अखेर मांडवगण रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू

श्रीगोंदा : शहरातील मांडवगण रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत ‘लोकमत’मध्ये गुरुवारी (दि. २३) वृत्त प्रसिद्ध होताच मोहन भिंताडे यांनी अडविलेले काम नगरपालिकेने गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरू केले.

रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी नगरपालिकेतील गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे तेथे येऊन थांबले होते.

काम अडविणाऱ्या व्यक्तीने मांडवगण रस्त्याचे बंद पडलेले काम कधी सुरू करणार असा लेखी खुलासा पालिकेकडे मागविला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

या वृत्ताची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली. काम सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला. गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे हे अडथळा असलेल्या ठिकाणी येऊन थांबले आणि खडीकरणाचे काम सुरू केले.

---

श्रीगोंदा पालिकेने रस्ता माझ्या मालिकेचे क्षेत्र असलेल्या गट क्रमांक ११०६ मध्ये करू नये. एवढेच म्हणणे आहे. या प्रश्नावर आपण न्यायालयात जाणार आहोत. आमचा या कामात अडथळा आणण्याचा उद्देश नाही.

-मोहन भिंताडे,

श्रीगोंदा

---

तीन वर्षांपासून कामात विनाकारण अडथळा आणला जात होता. यावर काही नागरिकांनी पालिकेकडे काम का होत नाही म्हणून तक्रारीही केल्या. शेवटी अडथळा असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे लागले. शेवटी संस्थेपेक्षा व्यक्ती मोठा नसतो. हाती घेतलेले काम पोलीस बंदोबस्तात पूर्ण करणार आहे. आम्ही विना कारण कुणावर अन्याय करणार नाही.

-मनोहर पोटे,

गटनेते, नगरपालिका, श्रीगोंदा

----

फोटो दोन

२० श्रीगोंदा रोड, २

श्रीगोंदा येथे मांडवगण रस्त्याचे काम सुरू करताना उपस्थित अधिकारी व इतर.

Web Title: ..Finally, the work of Mandvagan road started under police protection