श्रीरामपूर - राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात निळवंडे कालव्यालगत ओसाड ठिकाणी असलेल्या एका घरात सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणीच्या प्रकारावर पोलिसांनी छापा टाकत एका डॉक्टरसह एजंटला ताब्यात घेतले. या कारवाईत तपासणीसाठी आलेल्या महिलांनाही सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळावरून वैद्यकीय यंत्रसामग्रीसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
लोणी पिंपरी निर्मळ रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील दोन खोल्यांमध्ये हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती.त्यानुसार तात्काळ पथक नेमण्यात आले. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
छाप्यात दोन खोल्यांमध्ये गर्भलिंग तपासणीसाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन, मॉनिटर,बॅटरी वीजपुरवठा यंत्रणा,जेल, वैद्यकीय कागदपत्रे तसेच इतर उपकरणे आढळून आली. ही सर्व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळी उपस्थित डॉक्टर,एजंट तसेच संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून,संपूर्ण कारवाई पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने पार पाडली.
दरम्यान, याप्रकरणी लोणी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासा तालुक्यातील डॉ.राहुल भणगे एजंट अभिजीत भुसाळ यांचे विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रेक्टीशियन ॲक्ट १९६२ नुसार ३३,३३( अ) ३६ नुसार व गर्भधारणा पूर्व आणि प्रसुती पूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंधक कायदा १९९४ चे कलम ३(३) ,३(अ),३(ब),६(१),६(२),६(३),१८,२३(१),२४,२५,२६ बीएनएस कलम २२३ अन्वय लोणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि क्र .१६५/२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : Police raided a sex determination operation in Rahata, arresting a doctor and agent. Women were rescued, and sonography machines were seized. A case has been registered against the accused under relevant acts.
Web Summary : रहता में पुलिस ने लिंग निर्धारण के एक गिरोह का भंडाफोड़ किया, जिसमें एक डॉक्टर और एजेंट को गिरफ्तार किया गया। महिलाओं को बचाया गया, और सोनोग्राफी मशीनें जब्त की गईं। आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है।