शेतकऱ्याने घेतले एकरी ९३ टन उसाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:53+5:302020-12-25T04:16:53+5:30

कोपरगाव : कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वैजापूर तालुक्यातील नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भीमराज शिंदे ...

Farmers produce 93 tons of sugarcane per acre | शेतकऱ्याने घेतले एकरी ९३ टन उसाचे उत्पादन

शेतकऱ्याने घेतले एकरी ९३ टन उसाचे उत्पादन

कोपरगाव : कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वैजापूर तालुक्यातील नांदुरढोक येथील शेतकरी भास्कर भीमराज शिंदे यांनी ३२ गुंठे क्षेत्रात को ८६०३२ ऊस जातीचे ७५ टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात ९३ टन उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

त्याबद्दल त्यांचे कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कौतुक केले. शिंदे यांनी कोल्हे कारखान्यामार्फत कोइमतूर ऊस संशोधन केंद्रातून आणलेले को ८६०३२ ऊस जातीचे पायाभूत बेणे घेतले होते. शुद्ध व निरोगी बेणे, कंपोस्टपासून बनविलेले जिवाणू खतयुक्त समृद्ध सेंद्रिय खताचा वापर करून कोल्हे कारखान्याच्या शेतकी व ऊसविकास खात्याचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळेच विक्रमी उत्पादन घेऊ शकलो, असे शेतकरी भास्कर शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Farmers produce 93 tons of sugarcane per acre