शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांचा फास

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे.

संगमनेर : भारतातील एकाच राज्यातील शहरांना जोडणार्‍या एकमेव नाशिक-पुणे राष्टÑीय महामार्गाला तब्बल ३०५ अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत चार वेळा अतिक्रमणे हटविण्याचा बागूलबुवा उभा करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या कारवाई शुन्यतेमुळे महामार्ग धोक्याची घंटा ठरला आहे. नाशिक व पुणे या महानगरांना जोडणारा महामार्ग शहरातून जातो. महामार्गावर दुतर्फा अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरूंद झाला आहे. १३२ के.व्ही. ते प्रवरा पूल दरम्यान ३.४० किलोमीटर लांबीचा महामार्ग अधिकृत, अनधिकृत अतिक्रमणांनी व्यापला आहे. दुकानांपुढे कच्च्या-पक्या शेड उभ्या करून पथार्‍या पसरवून थेट रस्त्यावर व्यापार केला जातो. ग्राहकांची वाहने दुकानांसमोर लागतात. पार्र्किंगअभावी रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर उभी राहतात. महामार्गावरून नाशिक, पुणे, अहमदनगरकडे वाहतूक करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यात रस्त्यावर थाटलेल्या अतिक्रमणांमुळे ७-८ फूट रस्ता उरला आहे. बाजारपेठेमुळे दैनंदिन राबता असतो. वाहनांची रेलचेल व पादचार्‍यांच्या गर्दीमुळे रहदारीत अडथळे येतात. वाहतूक तासन्तास खंडित होवून वाहनांची कोंडी होते. अवजड वाहतूकीसाठी ९ किलोमीटर लांबीच्या बायपासची निर्मिती झाली. बायपासने वाहने धावू लागली खरी. पण, शहरातील वाहतुकीची समस्या मात्र तशीच राहिली. अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी संबंधीत महामार्ग उपविभाग व नगरपालिकेची आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण हटविण्याविषयी पालिका उदासिन आहे. महामार्ग उपविभाग दरवेळी अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्याचा फार्स करतो. कारवाई मात्र शून्य असते. महामार्ग उपविभागातील अधिकार्‍यांवर राजकीय दबाव, दुकानदारांशी असलेले हितसंबंध, आर्थिक तडजोडी आदी बाबींमुळे महामार्ग अतिक्रमणांनी पूर्णत: वेढला गेला आहे. लोकसंख्येसह वाहन संख्येत झपाट्याने भर पडत असल्याने महामार्गाचे रूंदीकरण होणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)