शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न सोडविण्यात अपयश

By admin | Updated: August 17, 2014 23:34 IST

पारनेर : पारनेर तालुक्याच्या नशिबात अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे़ तालुक्याला अनेक आमदार मिळाले़ मात्र, पिण्यासाठी व शेतीचा पाणी प्रश्न सुटला नाही़

पारनेर : पारनेर तालुक्याच्या नशिबात अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे़ तालुक्याला अनेक आमदार मिळाले़ मात्र, पिण्यासाठी व शेतीचा पाणी प्रश्न सुटला नाही़ केवळ सभामंडप व रस्त्याचे प्रश्न सोडविण्यालाच विकास म्हटल्याने पाणी योजनांकडे दुर्लक्षच होत आहे.पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील चास व निंबळक हे दोन जिल्हा परिषद गट समाविष्ट झाले आहेत. पारनेर तालुक्यात विकासाचा डांगोरा पिटला जात असला तरी गावांमध्ये सभामंडप व रस्ते बांधणे एवढ्यापुरतीच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मागणीची मजल गेली आहे. पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर, कान्हुरपठार,भाळवणी व नगर तालुक्यातील गावांना मिळवून देण्याच्या घोषणा स्थानिक नेते करतात़ दोन टी.एम.सी. पाणी पठार भागातील शेतीसाठी देण्याचे आश्वासन दिले जाते़ पण प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष झाले आहे़ त्यामुळे पारनेरसह नगर तालुक्याला वरदान ठरणारी साकळाई योजना फक्त निवडणुकीपुरतीच चर्चेत येते. दुसरीकडे कुकडी प्रकल्पात असणाऱ्या चौदा गावांमध्येच क्षमतेपेक्षा केवळ पन्नास टक्केच पाणी या गावांना मिळत आहे. त्यामुळे शेतीसाठी आवर्तन उशिरा सोडले तर या भागातील पिकेही मान टाकतात अशी अवस्था आहे. या पाणीप्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही.विसापूर धरणातून पारनेर, सुपा, म्हसणे, बाबुर्डी, वडनेर हवेलीसह वीस गावांसाठी पिण्याच्या पाण्याची पाणी योजना,भाळवणीसह चौदा गावांची पाणी योजना होणे आवश्यक आहे़ मात्र, भाळवणीच्या नळयोजनेचे पाईप चोरीला जाऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्यात दुष्काळ पडला की सुमारे शंभर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु होतात़ पण पारनेर तालुका कायमस्वरुपी टँकरमुक्त होण्यासाठी मुळा धरण, विसापूर तलाव, कुकडी कालवा, पिंपळगाव जोगाचे पाणी यांचा योग्य वापर करुन नळयोजना आखणे जरुरीचे आहे. सुपा एम.आय.डी.सी.त जपानी हब होणार आहे़यामुळे रोजगाराला चालना मिळेल़ मात्र, ढवळपुरी भागात मिनी एम.आय.डी.सी.चे स्वप्न दाखविले जात आहे़ मात्र, वरिष्ठ पातळीवर कोणतीच हालचाल नााही. (तालुका प्रतिनिधी)