शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वगसम्राज्ञीची चटका लावणारी एक्झिट, कांताबाई सातारकर यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:17 IST

Kantabai Satarkar: तमाशाच्या गौरवशाली परंपरेतील संघर्षाबरोबरच सुवर्णकाळ अनुभवलेल्या कांताबाईंच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

संगमनेर (जि. अहमदनगर) : मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांच्या निधनामुळे लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. तमाशाच्या गौरवशाली परंपरेतील संघर्षाबरोबरच सुवर्णकाळ अनुभवलेल्या कांताबाईंच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या गावात १९३९ मध्ये कांताबाई यांचा जन्म झाला. त्यांना तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळगावी आले. तेथे कांताबाई यांना ‘नवझंकार मेळ्यात’ नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करताना त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. पती खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईंनी स्वतःचा फड उभा केला.  

पुरुषी भूमिकाही हुबेहूब वठविल्यामराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतील. कांताबाईंनी वगनाट्यांतून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की, पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकिक होता.कांताबाई सातारकर यांची गाजलेली काही वगनाट्ये व त्यातील भूमिका‘रायगडची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी’ (सोयराबाई), ‘डोम्या नागअर्थात सख्खा भाऊ बहिणीचा पक्का वैरी’ (बायजा), ‘असे पुढारी आमचे वैरी’ (आवडा), ‘कलंकिता मी धन्य झाले’ (अनाथ आश्रमातील मुलगी), ‘पाच तोफांची सलामी’ (गजरा), ‘कोर्टादारी फुटला चुडा’ (सगुणा), ‘महारथी कर्ण’ (कुंती), ‘हरिश्चंद्र-तारामती’ (तारामती), ‘जय-विजय’ (नायकीन), ‘अधुरे माझे स्वप्न राहिले’ (नर्तकी), ‘गवळ्याची रंभा’ (रंभा), ‘गोविंदा-गोपाळ्या’ (राणी), ‘विशालगडची राणी’ (राणी), ‘बेरडाची औलाद’ (सुगुणा), ‘१८५७ सालचा दरोडा’ (सुशीला), ‘चित्तोडगडचा रणसंग्राम’ (राणाप्रताप), ‘तडा गेलेला घडा’ (अलका), ‘कोंढाण्यावर स्वारी’ (जिजाबाई).

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र