ग्रुप ग्रामपंचायत पुणतांबा यांच्या वतीने सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी नेहरू चौकात ध्वजारोहण केले. माझी वसुंधरा यांची शपथ नेहरू चौकामध्ये विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिली. या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच संगीता भोरकडे, माजी सरपंच मुरलीधर थोरात, सुरेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत, तलाठी दिलीप कुसळकर, जिल्हा परिषद सदस्य श्याम माळी, विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, हेड कॉन्स्टेबल दिलीप मंडलिक, पोलीस कॉन्स्टेबल अशोक झिने, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बर्डे, नीलेश गायकवाड, मनोज गुजराथी, प्राचार्य विशाल जाधव, राजेंद्र थोरात, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, सर्व शिक्षक उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पुणतांबा येथे ध्वजारोहण दिनकरराव भोरकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य अशोक जेजुरकर, एन. एस. नाईक उपस्थित होते. रुरल हायस्कूल पुणतांबा येथे संजय चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य अशोक ओहोळ यांनी मुलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गोरख जगदाळे उपस्थित होते.
पुणतांबा लिटल एंजल स्कूल येथे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी संचालक राहुल धनवटे, संचालिका वैजयंती धनवटे, दीपक धनवटे, दीपक नाईक, अनिकेत बिरारे, प्राचार्य दिलीप बोधक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
..
२७पुणतांबा शपथ
..
ओळी- ग्रुप ग्रामपंचायत पुणतांबा यांच्या वतीने सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी नेहरू चौकात ध्वजारोहण केले. माझी वसुंधरा... याबाबत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना शपथ दिली.
..