जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST2021-08-28T04:25:22+5:302021-08-28T04:25:22+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बूथ हॉस्पिटल ते ऐतिहासिक वस्तू संग्रालय पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली. त्यामुळे हा ...

Encroachments on Collector Office Road removed | जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील अतिक्रमणे हटविली

जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील अतिक्रमणे हटविली

अहमदनगर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बूथ हॉस्पिटल ते ऐतिहासिक वस्तू संग्रालय पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविली. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला असून, या मार्गावरील कच ही उचलून घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटाव मोहीम सुरू केली आहे. या पथकाने कापड बाजार येथील घास गल्लीतील अतिक्रमणे हटविली आहे. दोन दिवसांपासून या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ताही मोकळा झाला असून, उद्योग खाणीकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे शनिवारी नगर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील अतिक्रमणे शुक्रवारी हटविण्यात आली आहेत. तसेच या मार्गावरील टपऱ्या ही हटविण्यात आल्या. जिल्हाधिकारी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर टाकलेली कच ही शुक्रवारी जमा करून घेण्यात आली आहे.

.......

Web Title: Encroachments on Collector Office Road removed