शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगातून भरले अडीच कोटींचे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

अहमदनगर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शासकीय योजनांतून मिळणारा निधी वीज बिल भरण्यासाठी वापरण्याची वेळ महापालिकेवर आली ...

अहमदनगर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शासकीय योजनांतून मिळणारा निधी वीज बिल भरण्यासाठी वापरण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून २ कोटी ५० लाख रुपये वीज भरले असून, अमृत योजनेसाठी ७ कोटी ५० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यावर कळस असा की आयोगाच्या निधीतून अडीच कोटींचे वीज बिलही मनपाने भरले आहे.

केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेला पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी कचरा संकलन, कचरा प्रकल्प, कचरा डेपोकडे जाणारे रस्ते, यासह पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, या कामांसाठी वापरण्याचे संकेत आहेत. परंतु, ५० टक्के निधी इतरत्र वापरण्याची मुभा आहे. चालू अर्थिक वर्षात १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेला २० कोटी ५४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या खर्चास महासभेची मान्यता बंधनकारक आहे. प्रशासनाने निधी खर्चास मान्यता मिळावी, यासाठी प्रस्ताव नगरसचिव कार्यालयास सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये १५ व्या वित्त आयोगाचा खर्च झालेल्या निधीस मान्यता देण्याचा समावेश आहे. प्रशासनाने अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ५० लाख वर्ग केल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. तसेच थकीत वीज बिल भरण्यासाठी २ कोटी ५० लाख खर्च झाल्याचे म्हटले आहे. याशिवाय अमृत योजनेचा स्वहिस्सा भरण्यासाठी ५ कोटी वर्ग केले आहे. प्रशासनाने १५ व्या वित्त आयोगाचे १० कोटी विविध कामांसाठी वर्ग केले असून, उर्वरित निधी खर्च करण्यास मान्यता मिळावी, असे प्रस्तावात नमूद आहे.

.....

घनकचरा व पाणीपुरवठ्यासाठी १० कोटी

शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाचा पाणीपुरवठा व घनकचरा विभागासाठी प्रत्येकी ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, हा निधी याच विभागांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या खर्चास अंतिम मंजुरी मिळावी, यासाठीचा प्रस्ताव महासभेला सादर करण्यात आलेला आहे.

....

असा झाला निधी खर्च

वीज बिल- २ कोटी ५० लाख

अमृत पाणी योजना- २ कोटी ५० लाख

अमृत भुयारी गटार योजना स्वहिस्सा- ५ कोटी

...

प्रस्तावित खर्च

पाणीपुरवठा - ५ कोटी १३ लाख

.....

घनकचरा विभागासाठी ५ कोटी १३ लाख

बायोगॅस प्रकल्प- १ कोटी

कचरा प्रक्रिया प्रकल्प ५२५ लाख

ॲनिलवेस्ट प्रक्रिया प्रकल्प चालविणे- ३८ लाख

आरसीसी टॅंक- २५ लाख